नृत्यांगना गौतमी पाटीलचा रिक्षाचालकाच्या कुटुंबीयाबाबत धक्कादायक दावा; पैशाची मागणी…


पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाने काही दिवसांपूर्वी एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती.या अपघातात रिक्षा चालक मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आता गौतमी पाटील हिने काल एक पत्रकार परिषद घेत ‘मी त्या लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही. मला इकडून तिकडून खबरी येत आहेत. त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाही. मदतीची मागणी करण्यासाठी त्यांचा एकच आकडा नाही. ते पैशाची मागणी करत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

पुढे बोलताना गौतमी पाटील म्हणाली, मरगळे कुटुंबीय माझ्या मानलेल्या भावाकडे पैशाची मागणी करत आहे. त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाही.ते लाखांची मागणी करतात, नंतर 20 लाख, आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा आहे. माझ्या भावांपर्यंत आकडे येत आहेत आणि ते माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. माझा मानलेला भाऊ आहे. त्याच्याकडे पैशांची मागणी मरगळे कुटुंबांनी केली,” असा दावा गौतमी पाटील हिने केला आहे.

यावर आता जखमी मरगळे यांच्या कन्या अपर्णा मरगळे यांनी गौतमी पाटीलचा समाचार घेत सगळे आरोप फेटाळले आहेत. ‘गौतमी पाटील हिने आमच्या गरिबीची थट्टा उडवली आहे. गौतमी पाटील कधी म्हणतात की, आमच्याकडे पैसे मागितले आणि कधी म्हणतात की त्यांना कायद्याने जायचं होतं. त्यांच्या दोन्ही वाक्यांमध्ये कमालीची विसंगती दिसत आहे. तुम्ही एकदा ठरवा नक्की काय बोलायचं आहे आणि तुमचा हा मानलेला भाऊ नक्की कोण आहे, तुमचा कोणता भाऊ आमच्यापर्यंत आला, हे सगळ्या महाराष्ट्राला एकदा सांगून द्या. असं तिने खडसावून म्हटलं आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!