आज दादा तुम्ही हवेच होते!! मुंबई, पुण्याला पावसाने झोडपलेलं असतानाच अजितदादांची सर्वांनाच आली आठवण, कारण काय?


पुणे : आज मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना तर पावसाने झोडपून काढलं. नवीन आणि जुना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, कनेक्टींग लिंकवर दरड कोसळल्याने जवळपास चार तास मुंबई-पुणे मार्गावरील रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने रेल्वे मार्गही बंद झाल्याने या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टीव्हिटी जवळपास चार तास पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं. यामुळे आज सर्वांनाच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण झाली.

अजित पवारांचा अशाच आपत्कालीन परिस्थितीदरम्यान थेट कंट्रोल रुममधून आढावा घेताना जुना व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी केलेली पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.

‘दादा मिस यू’ या मथळ्याखाली सूरज यांनी ही पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, आज तुम्ही असता तर सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन पावसामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांचं नियोजन केलं असतं. प्रशासनावर वचक आणि काम करून घेण्याची धमक असणारा कामाचा माणूस आज आमच्या सोबत नाही ती उणीव सदैव जाणवते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचे सावट पसरले. अजित पवार आपल्या कामाच्या वेगळ्या जलद शैलीसाठी प्रसिद्ध होते. सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करत असत. यामुळे आज सर्वांना त्यांची आठवण आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!