DA Hike : होळीपूर्वी मोदी सरकार देणार लाखो कर्मचाऱ्यांना मोठं ‘गिफ्ट’, जाणून घ्या…

DA Hike : येत्या काही दिवसांत केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्याचा फायदा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होऊ शकतो.

यामुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्चमध्ये वाढण्याची शक्यता आहे. यात ४ टक्क्यांनी वाढ होईल, असे सांगितले जात आहे.
एकूण महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचेल. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर तो नव्या पद्धतीने मोजला जाईल. पुढील महागाई भत्त्याची आकडेवारी २९ फेब्रुवारीपासून येण्यास सुरुवात होईल.

या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. याअंतर्गत सरकार जानेवारी महिन्यात पहिली आणि जुलैमध्ये दुसरी दुरुस्ती करते. केंद्र सरकार पुढच्या महिन्यात मोठा निर्णय घेऊन होळीची भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. DA Hike

दरम्यान, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून भेट दिली होती.
आणि या वाढीसह त्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला होता. आता या वेळीही महागाईच्या दरानुसार सरकार पुन्हा ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.