पाकिस्तानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता..

कराची : सध्या बिपरजॉय चक्रीवादाळामुळे पाकिस्तानमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. या वाऱ्याचा वेग ताशी १७५ किलोमीटरहून अधिक आहे.

आळंदीत आम्हाला एकांतात नेऊन मारलं, वारकऱ्यांचा आरोपाने उडाली खळबळ..
त्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळाने रुद्र अवतार धारण केले आहे. आतापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १४५ जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.

मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, गुन्हे शाखेची कारवाई..

तसेच अनेकजण बेपत्ता झाले आहेत. खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू, डेरा इस्माईल खान, करक आणि लक्की मारवत येथे मोठे नुकसान झाल्याची माहिती पाकिस्तान प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
सिंहगड रोडवर धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या, पुण्यात गुन्हेगारी वाढली..
उशिरा मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-याने पाकिस्तानात कहर केला. त्यामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ८० घरांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, वादळाच्या तीव्रतेने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.