शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे ० टक्के दराने कर्जपुरवठा ही ठरली फक्त घोषणाच ! गत वर्षीची व्याजाची रक्कम चालू वर्ष संपूनही नाही ! चालू मार्च एण्डला व्याजाने भरणा सुरू…!


उरुळी कांचन : शेतकऱ्यांना जिल्हा बँकांच्या पीक कर्जापोटी ३ लाखापर्यंत चे कर्ज ० टक्के दराने देऊ करु म्हणून सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वसनांची पुन्हा एकदा होळी झाली असून शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षीही पिक कर्जाची ० टक्के व्याजदराची सवलत मिळालीच नसून शेतकऱ्यांकडून ६ टक्के पिक कर्जावरील व्याजाने वसुली करण्यास सुरुवात झाल्याने शासनाची घोषणा ही ‘बोलाचीच कडी बोलाचाच भात’ अशी झाली असून ‘भिक नको परंतु कुत्रे आवार’ अशी शेतकऱ्यांची आवस्था आहे.

मार्च महिन्याचे अर्थिक वर्ष संपत आल्याने जिल्हा बँकामार्फत कृषी सोसायट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याची लगबग सुरू झाली आहे.शेतकऱ्यांनी मुदतीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कृषी सोसायट्यांकडे कर्ज भरण्यासाठी धाव घेतली आहे.मात्र या संपूर्ण पीक कर्ज भरणा प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून पीक कर्जापोटी ६ टक्के व्याजाने पीक कर्जाचा भरणा कृषी सोसायट्यांकडून सुरू असल्याने शेतकऱ्यांना ० टक्के कर्जाची सवलतीच्या सवंग घोषणेचे काय झालेअसा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना बिनव्याजी दराने अर्थिक मदत करुन शेती दर हंगामी उभी करता यावी म्हणून केंद्र व राज्य सरकारने जिल्हा बँकांना ३ लाखापर्यंतचे पिक कर्ज हे ० टक्के दराने देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ३ टक्के केंद्र व ३राज्य सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार उचलण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा २०२१ -२०२२ व २०२२ -२०२३ या अर्थिक वर्षात पूर्ण झाली नसल्याची स्थिती आहे. गत वर्षी या योजनेनुसार शेतकऱ्यांना पिक कर्जावरील व्याजाचा परतावा शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकऱ्यांना ६ टक्के दराने कर्जाचा भरणा करावा लागला आहे. यावर्षीही ६ टक्के दराने भरणा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तर मार्च महिन्यात हा भरणा न झाल्यास शेतकऱ्यांकडून १२ टक्के भरणा करणे भाग पडणार असुन शेतकऱ्यांना  व्याजाचा भुर्दंड पडणार आहे.वास्तविक पाहता राज्यकर्त्यांनी ३ लाखांपर्यंतचेपिक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हेकर्ज फेडण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे.

शेतकऱ्यांकडून पिक कर्ज जुनं – नवं करुन फेडण्याची क्रयशक्ती वाढली आहे. मात्र शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करताना, शेतकऱ्यांना कर्जे भरून व्याजाचा परतावा न आल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे. चालू अर्थिक वर्ष संपत आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज ६ टक्के दराने कर्ज भरण्याची वेळ येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.

कर्ज माफी नाही अन् प्रोत्साहन लाभही नाही !

महाविकास आघाडी सरकार व नंतरच्या युती सरकारने शेतकऱ्यांची २०१६-१७, २०१७-१८, २०१९ -२० वर्षाची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफी केली आहे. परंतु अद्याप या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. तर सलग दोन वर्षे कर्जभरणा करणाऱ्यांना ५०हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी अजून प्रतिक्षा यादीतील लोकांना प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ न झाल्याने कर्जमाफी व प्रोत्साहन रक्कमेसाठी शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!