Crime News : धक्कादायक! उरुळी कांचन परीसरात तरुणीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल..

Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तुझ्या आई वडीलांना सोडुन दे आणि आपण पळून जाऊन लग्न करू, जर तु लग्नाला नाही म्हणालीस तर मी जिव देईन, अशी धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघकीस आली आहे.
ही घटना उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (ता. ०५) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एका २३ वर्षीय तरुणावर शनिवारी (ता.१६) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुशार काळे (वय. २३, रा. कोलवडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Crime News
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणीला तुषार काळे हा भेटण्यासाठी तीच्या घराजवळ आला होता. तरुणीने तु माझे घरी येवु नको असे सांगितले. तरी देखील तो घराजवळ आला. मला फोन करून तु मला भेटायला ये, नाहीतर मी तुझे घरी येईल असे म्हणाला, यावेळी तरुणी घाबरून आरोपी तुशार याला भेटण्यासाठी गेली.
यावेळी काळे याने मला तु माझेसोबत लग्न कर, तु तुझ्या आई वडीलांना सोडुन दे आणि माझे सोबत पळुन चल, असे म्हणुन माझा उजवा हात पकडुन ओढु लागला, जर तु माझेसोबत लग्न करण्यासाठी नाही म्हणालीस तर मी जिव देईन, अशी धमकी दिली.
तु फक्त माझीच आहेस, मी तुला दुसर कोणाची होवु देणार नाही, असे म्हणुन त्याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर निघून गेल्यानंतर फोन करून तु माझेसोबत लग्न कर असे म्हणुन वारंवार फोन करून मला त्रास दिला.
तसेच शुक्रवारी (ता. १५ ) हडपसर येथील कंपनीतून तरुणी तीच्या मैत्रिणसोबत कामावरून घरी येताना तुशार काळेने पाठीमागे येवुन अडवून पुन्हा धमकी दिली. त्यावेळी तरुणीच्या मैत्रिणीने त्यास समजावुन सांगितले.
दरम्यान, घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तरुणीने आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तुशार काळे याचे विरूध्द तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.