Crime News : पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीचे अनैतिक संबंध, ५ जणांचा भयंकर शेवट, धक्कादायक माहिती आली समोर


Crime News : बिहारमधील भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या करून त्यासोबत दोन मुले आणि सासूचा गळा दाबून स्वतःला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये नोकरी करताना झाली होती. पुढे जाऊन या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

त्यात नीतूने बिहार पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी केली. २०१५ ला तिला यश मिळालं. कॉन्स्टेबल बनल्यानंतर २०१९ मध्ये नीतूने जानेवारीत पंकजसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना २ मुले झाली. सुरुवातीला नीतूची पोस्टिंग नवगछिया इथं होती. त्यानंतर भागलपूर एसएसपी कार्यालयात बदली झाली. Crime News

दरम्यान, अनैतिक संबंधांवरून पंकज आणि नीतू यांच्यात भांडण होऊ लागली. नीतूचे अन्य पुरुषाशी संबंध आहेत असं पंकजला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद सुरू झाले. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून पंकजने आत्महत्येपूर्वी पत्नी, २ मुले आणि सासूचा खून केल्याचे कबुल केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!