Crime News : महाराष्ट्र पुन्हा हादरला! पालघरमध्ये १० वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार…

Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आली आहे.

गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. ३० वर्षाच्या दोन नराधमांनी मुलीला अडवले आणि निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले आहे. Crime News
प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. अंगावरील फाटलेले कपडे बघून आई वडिलांनी या चिमुकलीची चौकशी केली. त्यावेळी झालेला सगळा प्रकार सांगितला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, (ता.२) रोजी १० वर्षीय पीडिता गणपती आगमन मिरवणूक बघण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मिरवणूक बघून घरी परतत असताना दोघांनी तिला आडवले. या दोघांनाही ती ओळखत होती. कारण, पीडिता राहत असलेल्या परिसरातच दोन्ही आरोपी राहतात.

निर्जनस्थळी नेऊन केले अत्याचार दोन्ही आरोपींनी तिला बोलण्यात गुंतवले आणि नंतर जबरदस्तीने निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी नंतर तिला सोडून दिले. दरम्यान, मुलगी परत न आल्याने तिचे आईवडील शोधत होते. रात्री १०-१०.३० वाजेच्या दरम्यान ती घरी आली. तेव्हा तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते.
आईवडिलांनी तिला कपडे फाटण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. आईने तिला नीट बघितले तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग होते. पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आईवडिलांनी सांगितली.
दरम्यान, आईवडिलांनी पीडितेसह पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला आणि अटक केली. न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.