Crime News : ब्रेकअपनंतर घडली भयंकर घटना, फोटो डिलीट करण्यासाठी प्रियकराचा मोबाईल घेतला, पण गॅलरी बघताच तरुणीला बसला धक्का…
Crime News : एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आपल्या मोबाइलमध्ये गर्लफ्रेंडसह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाद झाल्यानंतर सदर तरुणाच्या २२ वर्षीय गर्लफ्रेंडने त्याचा मोबाइल तपासला असता हा प्रकार समोर आला.
आदित्य संतोष (वय. २५) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, बेलंदूर शहरातील एका खासगी कंपनीतील २२ वर्षीय तरुणीचे तिच्यासोबत काम करणाऱ्या आदित्य संतोष या तरुणासोबत मागील चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला.
त्यामुळे तरुणीने आदित्यच्या मोबाइलमधील स्वत:चे फोटो डिलिट करण्यासाठी त्याचा मोबाइल घेतला. मात्र त्यानंतर तिला मोठा धक्का बसला. कारण आदित्य याच्या मोबाइलमध्ये तिच्यासह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो होते.
हा प्रकार समजल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने याबाबत आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली. तसेच कंपनीतील इतर तरुणींच्या बाबतीत असा प्रकार होऊ नये, म्हणून आदित्य संतोष याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीनंतर कंपनीच्या वरिष्ठांनी (ता. २३) रोजी आदित्य संतोष याच्याविरोधात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.