Crime News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, घटनेने उडाली खळबळ…

Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बदलापूर अन् कोलकाता येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात देखील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणाऱ्या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर हादरून गेले असून, राज्यात महिला आणि चिमुकलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये ७३ वर्षीय श्रीपती भोसले याआरोपींने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. Crime News

या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या ७३ वर्षीय नराधमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
