क्रिकेटर दीप्ती शर्माच्या मैत्रिणीने केली २५ लाखांची फसवणूक, धक्कादायक प्रकार आला समोर…


लखनौ : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उत्तर प्रदेश पोलिस उपअधीक्षक दीप्ती शर्मा संबंधित लाखो रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दीप्तीला तिच्या मैत्रिणीनेच फसवले आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

दीप्तीची जवळची मैत्रीण आणि सहकारी क्रिकेटपटू आरुषी गोयल आणि तिच्या कुटुंबावर २५ लाख रुपयांची फसवणूक आणि चोरीचा आरोप आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. दीप्ती शर्माची मैत्रीण आणि ज्युनियर क्रिकेटपटू आरुषी गोयलने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात दीप्तीचा भाऊ सुमित शर्माने आग्रा येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीप्तीने आरुषी आणि तिच्या कुटुंबाला २५ लाख रुपये उधार दिले होते, परंतु जेव्हा तिने पैसे परत मागितले तेव्हा आरुषी आणि तिच्या पालकांनी पैसे परत करण्यास नकार दिला. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. दीप्ती शर्माचा आग्रा येथील राजेश्वर मंदिराजवळ एक फ्लॅट आहे.

जिथे आरुषी गोयल अनेकदा येत होती. २२ एप्रिल रोजी ती गुपचूप फ्लॅटमध्ये आली आणि सोन्या-चांदीचे दागिने, अडीच हजार डॉलर्स आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन गेली. आग्राचे डीसीपी सोनम कुमार यांनी पुष्टी केली की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि कसून तपास सुरू आहे.

दरम्यान, आरुषी गोयल महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचा भाग राहिली आहे. या संघाची कर्णधार दीप्ती शर्मा आहे. आरुषी गोयल ही रेल्वेमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क आहे आणि ती आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशन, आग्रा रेल्वे डिव्हिजन येथे तैनात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!