वाद पेटणार; विठू माऊलीच्या मंदिरात हिंदीतून पूजा, कारवाई होणार?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदी सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारने मागे घेतला. आता हिंदी भाषेचा वाद पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका अमराठी कुटुंबासाठी पूजा हिंदीमध्ये केल्याचा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने केला आहे. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा करत मी हे प्रकरण लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.त्यांनी या संदर्भात पंढरपूर मंदीर समितीकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीला मंदीर समितीने प्रतिसाद दिला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू, असे या मंदीर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या सर्व प्रकरणानंतर पंढरपूर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्याकडे सर्व पूजा मराठीतूनच होतात. आपण हिंदी भाषेतून कुठलीही पूजा करत नाही. भाविकाला मराठी समजत नसल्यामुळे आपण फक्त पूजेची माहिती हिंदीतून दिली. यापुढे पूजा मराठीतूनच होईल असं त्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!