खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटला, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक झाली ठप्प..


पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. भरधाव वेगात असणारा ट्रेलर खंडाळा बोगद्यात उलटला.

 

यामुळे मदतकार्य देखील करताना अडचणी निर्माण होत आहेत. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या हा कंटेनर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

दरम्यान, ट्रेलर रस्त्यात आडवा झाल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या ट्रेलर हटवण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

सध्या पर्यायी मार्ग निवडून वाहतूक केली जात आहे. ही घटना घडल्यानंतर रोड सुरक्षा यंत्रणा कामाला लागली असून लवकरच कंटेंनर बाजूला करून वाहतूक पूर्वरत केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!