मुलांना मोबाइल दिल्याचा परिणाम!! म्हशी घ्यायला कष्ट करून बापाने साठवले सात लाख, मुलाच्या फ्री फायर गेममुळे उडाले, पालकांना धक्का..

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. असे असताना सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही अँप घेतले आणि काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली.
यामुळे बैंक खात्याशी लिंक असलेला मोबाइल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा प्रत्यय याठिकाणी आला. याठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्याने नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. याच्या मागे त्यांनी नियोजन केले होते.
त्यांना मे महिन्यात ते हरियाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन खात्यात साठवलेल्या पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. त्यांच्या खात्यावर फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले.
यानंतर बँकेने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. पुढे शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शेतकऱ्याच्च्या मोबाइलपासून तपासाला सुरुवात केली. यामध्ये बँकेचा मेसेज आला नाही. यामुळे स्टेटमेंटवरुन उलगडा झाला. यानंतर मात्र ट्रान्झेक्शन आयडीवरून शोध घेतल्यानंतर काही रक्कम फ्री फायर गेममधील आभासी शस्त्र खरेदीसाठी गेल्याचे समोर आले.
हा सर्व प्रकार त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाकडून नकळत घडला. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे मुलांच्या हातात मोबाइल देताना आता काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या अँपद्वारे मोबाइलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळविल्याचे स्पष्ट झाले.