पुणे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार ; माजी आमदार संजय जगतापांचा भाजपात प्रवेश


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. जगताप यांनी या बालेकिल्लाची बांधणी केली होती. मात्र आता पुढील काळात काँग्रेससाठी फक्त हा इतिहास उरणार आहे. काँग्रेसची मोठी संघटनात्मक बांधणी असलेल्या पुरंदरचा गड आता भाजपने काबीज केला आहे.आज माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला आहे.

दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांचा प्रचार केला नाही आणि महाविकास आघाडीने देखील साथ दिली नाही. अशा स्वरूपाची तक्रार होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्याला कायमच तोंडावर आपटवले अशी तीव्र नाराजी व्यक्त करत संजय जगताप यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!