पुण्यातील काँग्रेसचा आवाज हरपला! जेष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन, ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज (ता.६) पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे.

त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.

पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे एक सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती.

राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरु झाला. 2020 च्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, ज्यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता.

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, एप्रिल २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांची भेट घेतली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!