Congress : मोठी बातमी! काँग्रेस करणार ५ आमदारांवर कारवाई, थेट नावच आली समोर…


Congress : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून 12 उमेदवार रिंगणात होते.

यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे मात्र शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला होता. दरम्यान काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळेच जयंत पाटील यांचा पराभ झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. Congress

यानंतर आता काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ज्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिले आहेत.

तर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!