‘कॉकरोच जनता पार्टी’ने मोडले सगळे रेकॉर्ड; सोशल मीडियावर तुफान चर्चा..


मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल मोहिमेची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. अगदी कमी कालावधीत या ऑनलाइन चळवळीने लाखो युजर्सचे लक्ष वेधून घेत सोशल प्लॅटफॉर्मवर मोठी ट्रेंडिंग जागा मिळवली आहे.

सुरुवातीला हा एक इंटरनेट विनोद वाटत असला तरी, काही दिवसांतच या मोहिमेभोवती मोठा ऑनलाइन जनसमर्थनाचा प्रवाह तयार झाल्याचे दिसत आहे. विविध प्लॅटफॉर्मवर यासंबंधी मीम्स, चर्चा आणि व्हायरल पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला आहे.

या वेगवान वाढीमुळे ही चळवळ अनेक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल पेजेसशी तुलना केली जात आहे. काही ठिकाणी याला “रेकॉर्ड ब्रेकिंग ऑनलाइन मूव्हमेंट” म्हणूनही संबोधले जात आहे.

या मोहिमेमागे छत्रपती संभाजीनगर परिसरातील अभिजीत दीपके यांचे नाव घेतले जात असून, त्यांनी परदेशात असताना या डिजिटल उपक्रमासाठी सोशल मीडिया हँडल्स आणि प्लॅटफॉर्म तयार केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या संपूर्ण ट्रेंडवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहीजण याला क्रिएटिव्ह डिजिटल आंदोलन म्हणत आहेत, तर काहीजण याकडे एक तात्पुरता इंटरनेट ट्रेंड म्हणून पाहत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!