मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार….!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर या दौऱ्याबाबत तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सर्वजण अयोध्येत जावून रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे.
त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. याआधी आमदारांनी गुवाहाटी येथील प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिलेली.
सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. तसेच नवं सरकार स्थापन झाल्यास आपण पुन्हा दर्शनासाठी येऊ, असा नवस त्यांनी केलेला. सध्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.