दहावीचा निकाल आज जाहीर! विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; ‘या’ वेबसाइटवर पाहता येणार निकाल


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असून, लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

यंदा राज्यभरातून तब्बल १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे निकालाबाबत राज्यभरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी कोणता विभाग अव्वल ठरणार, मुली पुन्हा बाजी मारणार का, तसेच एकूण निकालाची टक्केवारी किती लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल सीट नंबर आणि आईच्या नावाच्या मदतीने ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेलाही वेग येणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विद्यार्थ्यांना पुढील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे :

. results.digilocker.gov.in
२. mahahsscboard.in
३. sscresult.mkcl.org
. results.targetpublications.org

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!