मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा ; ‘या ‘कारणाने निलंबन नाही तर बडतर्फ केलं जाणार…

पुणे,: विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी घटल्याची माहिती दिली.तसेच ड्रग्ज प्रकरणावर चिंता व्यक्त करत त्यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे. जो ड्रग्जच्या केस मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोपी सोबत सहभागी असेल त्याला निलंबित केलं जाणार नाही तर थेट बडतर्फ केले जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिली.

राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच नागपुरात अकरा टक्क्यांनी गुन्हेगारी घटल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना इशारा दिला. तसेच आतापर्यंत 13 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात दिली.
दरम्यान 2024 च्या मे महिन्याच्या अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती. तर 2025 च्या मे महिन्याच्या अखेरीस 2194 आरोपींना अटक केली आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्याला आपण नार्कोटिस्कचा वेगळा सेल तयार केलेला आहे. त्यामध्ये 5 हजार 975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिस्क सेलकरता काम करत आहेत. असे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं.
