विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत विठ्ठलभक्तांसाठी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरु होण्याच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे अनेक वारकरी लोकांना विठुरायाचे दर्शन मिळत नव्हते. यामुळे बराच गोंधळ देखील उडायचा. मात्र याच गोष्टीचा विचार करून आता वारकऱ्यांना होणार त्रास टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचां दर्शन घेता यावं, यासाठी भाविक अनेक तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. त्याचवेळी व्हीआयपी मंडळी दर्शन घेण्यासाठी गर्दी करुन नंब लावतात.

हे टाळण्यासाठी शिंदे सरकारने धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरु असतानाही सामान्य भाविकांना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
