नागपूर दंगलखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योगी पॅटर्न! दंगलखोर फहिम खानाच्या घरावर चालविला जेसीबी…

नागपूर : नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान याचा घरावरील कारवाईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.
आज मनपाने फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या दरम्यान या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपुरातील दंगलीचा सूत्रधार फहीम खान शमीम खान याच्या घरावर मनपाने बुलडोझर कारवाई केली आहे.
फहीम खान याच्या नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधतांना 86.48 चौरस मीटरवर बेकायदेशीररीत्या बांधलेल्या बांधकामप्रकरणी महापालिकेने 21 मार्च रोजी नोटीस बजावली होती, नागपूर महानगर पालिकेने या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.
मनपाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा..
फहीम खानचे घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांना याची नोटीस बजावली. ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली. त्यामुळे फहीमच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.