मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळत बदल…


मुंबई : काल मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. यानंतर आता लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनावर टीका केली जात आहे.

आता वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांनी सांगितले की, कालची घटना गंभीर आहे. मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी जास्त आहे. यामुळे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत.

लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहिती आहे. येत्या काळात भाडं न वाढवता एसी ट्रेन देण्याविषयी केंद्र सरकार विचार करत आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळत बदल करण्यात आला आहे.

असे असताना मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणं थोडं कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हा अपघात कसा झाला, याबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे. मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य लोकांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!