छगन भुजबळांची अक्कल दाढ पडली, बुद्धी…; जरांगे पाटील यांचे जोरदार उत्तर


बीड : ओबीसी नेत्यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे महाएल्गार सभा आयोजित करीत मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांना आव्हान दिले. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आमच्या ओबीसींच्या बोकांडी बसवण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा सवाल केला.

तसेच छगन भुजबल यांनी मराठा आंदोलक नेते जरांगे पाटील यांचा ‘दरिंदे पाटील’ असा उल्लेख करीत त्यांच्या मोठी टीका केली आहे. यावर आता जरांगे पाटील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

ओबीसी समाजाच्या एल्गार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करीत आहेत. आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. मराठ्यांनी आपल्या लेकरांचं भवितव्य वाचवण्यासाठी तोडीस तोड उत्तर द्यायलाच हवं.

       

भुजबळ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “भुजबळ काहीही बरळत आहेत, त्यांची अक्कल दाढ पडलीय. घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतोय तसं त्यांचं झालं आहे. स्वतःच्या चक्रव्यूहात ओबीसी नेत्यांना अडकवून त्याचा देव्हारा ते करीत आहेत.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, तुम्ही कितीही दडपण आणा, पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. बीड जिल्ह्यातूनच मराठे दिशा दाखवतील. जातीय दंगली घडवून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!