महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल


लोणी काळभोर, ता. २० : हवेली तालुक्यातील पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौक परिसरात धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

याप्रकरणी पोलीस कअंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्यावतीने दिलेल्या फिर्यादीवरून

राजेश लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पेठ नायगाव, ता. हवेली) व शशीन्द्रण नारायणन उन्नियालीक्कील (वय ६०, रा. रायकर वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सायंकाळी पोलीस अंमलदार अशोक गिरी व सचिन सोनवणे हे लोणी स्टेशन परिसरात पेट्रोलींग करत होते. सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन चौकाच्या पूर्वेकडील बाजूस पुणे–सोलापूर महामार्गावर मारुती कंपनीची इस्टिलो क्रमांक एमएच १२ एचएन ६१८९ ही चारचाकी गाडी रस्त्यावर बेवारस व धोकादायक स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना आढळून आले. चौकशीत हे वाहन शशीन्द्रण उन्नियालीक्कील यांचे असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी सुमारे ७.५५ वाजता लोणी स्टेशन चौकाजवळील सिद्धेश्वर हॉटेलसमोर पुणे–सोलापूर महामार्गावर ह्युंदाई कंपनीची ऑरा कार क्रमांक एमएच १२ एक्सयू ५७४८) ही गाडी धोकादायक पद्धतीने उभी असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत हे वाहन राजेश चौधरी यांचे असल्याचे समोर आले. या वाहनामुळेही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

या दोन्ही वाहनचालकांनी सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सरकारतर्फे स्वतंत्र फिर्याद दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!