बारामतीतील सांगवीमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या…!

बारामती : सांगवी (ता, बारामती ) येथे एका अज्ञात व्यक्तीने तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (ता. १२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विनोद फडतरे हा सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी वरुन गेला होता. त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Views:
[jp_post_view]