ब्रेकिंग! वाल्मीक कराडचा मुलगा मोठा गौप्यस्फोट करणार ; ‘त्या’ पोस्टने गुढ वाढलं…


बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यानंतर आज वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याने फेसबुकवर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे.ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं म्हटलं आहे. या पोस्टमुळे सुशील कराड नेमकं काय बोलणार? काही मोठा खुलासा करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांचा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्याला मोठा दणका बसला.दुसरीकडे त्याचा मुलगा सुशील कराड याने लिहलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.ज्यामध्ये आता मात्र सर्व काही बोलणार असल्याचे लिहिल आहे. या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातल्या परळीमधील महादेव मुंडे यांची देखील हत्या झाली आहे. या प्रकरणात देखील वाल्मिक कराड याच्यावरच आरोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या मुलाला अभ्यासिकेमध्ये जात असताना मारहाण झाली होती. या प्रकरणात संशयाची सुई सुशील कराड याच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नीने सुशील कराडवर आरोप करत संरक्षणाची मागणी केली होती, त्यानंतर आता सुशील कराडची ही पोस्ट व्हायलर झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!