ब्रेकिंग! 50 दिवसापासून फरार असलेला शिवसेनेच्या मंत्र्याचा मुलगा अखेर पोलिसांत सरेंडर…


पुणे: महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणामुळे चर्चेत आलेले आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले गेल्या दीड महिन्यापासून फरार होते. अखेर त्यांनी स्वतःहून महाड शहर पोलीस ठाण्यात सरेंडर केल आहे. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर त्यांनीं हे पाऊल उचललं आहे.

गेल्या महिन्यात महाड नगरपालिकेचे मतदान सुरू असताना दोन राजकीय गटात मोठा वाद झाला.यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता.

या हिंसाचार आणि राडा प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटकेच्या भीतीने ते गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी देखील केली मात्र ती सापडले नाहीत. अखेर ते पोलिसांसमोर आज शरण आले.

विकास यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. मुलावर एवढे गंभीर गुन्हे असताना भरत गोगावले मंत्रीपदी कसे असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.या प्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला झापल्यानंतर विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!