ब्रेकिंग! 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय,मतदानाचा टक्का वाढणार?


मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला असताना राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

15 जानेवारी 2026 (गुरुवार) रोजी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत यावेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.मतदारांना आपला मतदानाचा हक्क विनाअडथळा बजावता यावा, यासाठी सरकारने 15 जानेवारी रोजी सुट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मतदानाचा टक्का किती वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य सरकारने 2026 वर्षासाठी आधीच 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यामध्ये 15 जानेवारीचा समावेश नव्हता. आता विशेष तरतूद म्हणून ही महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणुका होत आहेत, त्याच कार्यक्षेत्रासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

या सुट्टीमुळे मुंबईतील शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आरबीआयच्या मुंबईसाठीच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत सध्या 15 जानेवारीचा समावेश नसल्याने बँकांच्या कामकाजाबाबत संभ्रम कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!