ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, घरात घुसून चाकूने केले वार, रुग्णालयात दाखल, घटनेने बॉलीवूडमध्ये खळबळ…


मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर समोर आले. यावेळी चोराने पकडले जाण्याच्या भीतीने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले.

यामध्ये तो जखमी झाला. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. घटनेनंतर चोर पळून गेला. चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सविस्तर तपास करत असून सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!