ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवारांना पराभव जिव्हारी; गुप्त बैठकीच्या हालचालीना वेग, घेणार मोठा निर्णय?

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपसह महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.पण या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही महापालिकेवर एकहाती विजय मिळवता आला नाही.महापालिकेचा हा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून अजित पवार बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यानंतर आता ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.अजित पवारांसोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे देखील आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडाफडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दुसरीकडे, महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट महत्त्वाचे असल्यास मानले जात आहे.. यासाठीच ते शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचं देखील सांगितलं जात आहे.

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.सध्या पवार काका पुतण्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार अशाप्रकारे शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
