ब्रेकिंग! पराभव बिहारमध्ये अन भूकंप महाराष्ट्रात; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, काय आहे कारण?


पुणे : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा मोठा पराभव झाला असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. या पराभवाचा भूकंप आता महाराष्ट्रात झाला असून काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसला आहे. बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सोडत तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तडकाफडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दयानंद चोरगे हे काँग्रेसचे भिवंडीतील उमेदवार होते. माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं दयानंद चोरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र त्यांनी पत्रात जरी असं म्हटलं असलं तर देखील ते गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक निवडणुकांमध्ये डावलं गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. बिहारचा निकाल हाती येताच दयानंद चोरगे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडांवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 96 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर जेडीयूला देखील मोठं यश मिळालं आहे, जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, बिहारमधील पराभवानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसला दणका बसला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!