ब्रेकिंग! मनसे नेते अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल ; लेकाच्या गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

पुणे : मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यापासून धुळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यावर त्यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,मला अभिमान आहे, मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहेत. पण आम्ही तस होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात, पंतप्रधान तिथे येऊन गेले पण त्यांना वेळ शिवरायांच्या पदाच्या लोकार्पणासाठी मिळाला नसेल असे म्हणत त्यांनी गुन्ह्यासं दर्भात भूमिका मांडली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे. परंतू वांद्रे येथील किल्ल्यावर दारू पार्टी झाली आहे. या पार्ट्यांना कोणी परवानगी दिली. किल्ल्यांवर झोपडी बांधायला कोण परवानगी देते? इथे काय केले तर लगेच पोलीस येतात मग तिकडे का नाही पोलीस पाहात असाही सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. निवडणूकीसाठी जर दोन बंधू एकत्र येऊन लढणार असेल तर चांगले आहे असेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, गेल्या तीन वर्षापासून ही केस सुरू आहे सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत येत नाही.कोणाला बोलायचं हाच प्रश्न आहे पक्षच बळावून घेतला जात आहे. आता जानेवारीमध्ये निकाल देणार आहे तोपर्यंत निवडणुका होऊन जातात तुम्हाला निवडून येणार अशी खात्री आहे. तर मग तुम्ही मैदानात आहे आणि निवडणूक लढा असा आव्हान त्यांनी केल आहे
