ब्रेकिंग! लाडक्या बहिणीच्या पैशावर डल्ला ; ‘या’ कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका बसणार, थेट होणार कारवाई!


पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी ‘लाडक्या बहिणीं’ची ईकेवायसी सुरू आहे. तसेच योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे.अशातच आता या लाडक्या बहिणींच्या पैशावर अनेक सरकारी कर्मचारी,शिक्षक आणि पोलिसांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. योजनेच्या गैरफायदा घेणाऱ्यांना आता कारवाईचा मोठा दणका बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा गैरफायदा घेतला आहे.अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेची रक्कम लाटली आणि दर महिन्याला 1500 रुपये पदरात पाडून घेतल्याचे उघड झाले आहे. त्या सर्वांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे.अनेक कर्मचाऱ्यांनी या पैशांवर डल्ला मारल्याचे उघड झाले असून ते कर्मचारी कोणत्या विभागातील आहे, ते महिन्याभरात स्पष्ट होईल. त्यानंतर त्या संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात येणार आहे, तसेच लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे.

एवढंच नव्हे तर या योजनेचे त्यांनी आत्तापर्यंत जेवढे पैसे लाटले आहेत, ती सर्व रक्कम वसूल केली जाणार असून त्यांची पगारवाढ रोखण्यासंदर्भातही पावले उटलून कारवाई केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

       

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर यापुढे संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आधी त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे आत्तापर्यंत लाखो महिलांचे ईकेवायसी अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून ही मुदत वाढवण्यात आली असून आता 31 डिसेंबर 2025 ई-केवायसी करता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!