ब्रेकिंग! अजित पवारांनी पत्ता उलगडला ;बारामतीत नगराध्यक्षपदासाठी उतरवला तगडा उमेदवार, तिहेरी लढत रंगणार?

बारामती: तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या बारामती नगरपरिषद निवडणुकीत अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बारामतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिहेरी लढत होणार आहे.या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी सचिन सातव यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स ठेवण्यात आला होता. अनेक नावांची चर्चाही रंगली होती. मात्र, अखेर सर्व अंदाजांना पूर्णविराम देत सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची उमेदवार यादी

नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव
प्रभाग क्र. १ : मनिषा समीर चव्हाण, अविनाश निकाळजे
प्रभाग क्र. २ : जय पाटील, अनुप्रिता डांगे
प्रभाग क्र. ३ : प्रविण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे
प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर, संपदा चौधर
प्रभाग क्र. ५ : किशोर आपणासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पांगळे
प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल
प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुड, भारती विश्वास शेलके
प्रभाग क्र. ८ : अमर घुमाळ, श्वेता योगेश नाटे
प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतिबा चव्हाण
प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख, अनिता गायकवाड,
प्रभाग क्र. ११ : संजय संधवी, सविता जाधव,
प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण, सारिका अमोल वाघमारे
प्रभाग क्र. १३ : बिरू भाऊसाहेब मांदरे, सुनीता अरविंद बगाडे
प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ, आप्पा अहीवळे
प्रभाग क्र. १५ : जितेंद्र बाबनराव गुजर, मंगल जयरकश किरवे
प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप, गौरख पारसे
प्रभाग क्र. १७ : अल्ताफ सय्यद, शमीला शिवाजीराव ढवाण
प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे, अखिनी सूरज सातव
प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सरसे, प्रतिभा विजय खारत
प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रविण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, फरहीन फिरोज बागवान

दरम्यान बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदासाठी गोविंद देवकाते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकासागरचा उमेदवार अजूनही गुलदस्तात आहे. महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणारे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.