प्रियकराने प्रेयसीचा खून करत केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरलं…


साजापूर : परिसरात एकाने प्रेयसीचा खून करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी दुसरे लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे

याबाबत माहिती अशी की, वैष्णवी खराडे ही साजापूर येथे राहत असून ती वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत होती. चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तिच्या सोबत राहण्यासाठी आला होता. नळाला पाणी आल्याने घरमालकाची मुलगी ही त्यांना सांगण्यासाठी गेली होती.

नंतर दरवाजा ठोठावला, पण आतून आवाज आला नाही. त्यानंतर घरमालकानेही आवाज देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार पाहून शेजारचे नागरिकही तेथे जमा झाले. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा एक तरुण साडीच्या साहायाने गळफास घेतलेला दिसला, तर एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली दिसली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना रुग्णवाहिकेतून नेले असता डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले. वैष्णवी व शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने दोघांनी लग्न केले. त्यानंतर चार-पाच महिन्यांपूर्वी शिवानंद हा तिच्या सोबत राहण्यासाठी आल्याने तिने वरील रूम बदलून खाली दोन रूम घेतल्या व ते दोघे राहत होते.

असे असताना मात्र, शिवानंद याने तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले. यातून दोघांमध्ये वाद झाल्याने तिचा खून करून त्याने स्वत: गळफास घेतल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!