बॉयफ्रेंडनेच केला घात, आयटी इंजिनिअर तरुणीवर नराधमाचा कारमध्ये अत्याचार, मग मित्रांना बोलवत आळीपाळीने…,घटनेने पुणे हादरले

पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. आरोपीनं पीडित तरुणीवर आधी कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना फोन करून बोलावलं आणि तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर विकृतीचा कळस गाठला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून पीडित तरुणीचा प्रियकर आहे.आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिचा आर्थिक आणि मानसिक छळ केला. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी मूळची कर्नाटकातील असून ती सध्या पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तिची २०२१ साली फेसबुकवरून आरोपी तमीम हरसल्ला खानशी ओळख झाली. पुढे ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली. लग्नाचं आमिष दाखवत तमीमने तरुणीला मुंबईच्या कांदिवली परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
तेथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना तमीमने पीडितेच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला पुण्यात घेऊन जाऊन कारमध्येही पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. मात्र हे सर्व इथेच थांबले नाही. त्याने त्याचे तीन मित्र बोलावून पीडितेवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले. या फोटोच्या आधारे तिला सातत्याने ब्लॅकमेल केलं जात होतं. तमीम खानसह इतर आरोपींनी हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले आणि दोन महागडे आयफोनही घेतले.
दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून हा छळ सुरू होता. मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपी तमीम खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.