धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंची दिली सुपारी !! राज्याच्या राजकारणाला हादरवणारी माहिती आली पुढे…


मुंबई : काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंविरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरठे झिजवत होते असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. यामुळे आता राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली असून खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात आता सख्य आहे. पण आधी परिस्थिती वेगळी होती, असेही त्यांनी सांगितले आहे.

याबाबत अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात आहेत. आपण असली कामं करत नसल्याचं त्यावेळी त्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड जवळीकता असल्याचं दमानियांनी यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंनी त्यावेळी बहीण पंकजांविरोधात सुपारी देऊ केली होती असंही अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच धनंजय मुंडेंवर दमानियांनी गंभीर आरोप केलेत. या आरोपांमुळं धनंजय आणि पंकजा या भाऊबहिणींच्या नात्यात पुन्हा दुरावा येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. खोटे गुन्हे दाखल करून आणि धमकी देऊन कोट्यवधींची जमीन लाखो रुपयात घेल्याचं दमानिया म्हणाल्या आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. आज अजित पवार देखील बीड दौऱ्यावर आहेत.

तसेच धनंजय मुंडे, वाल्मिक कराट आणि घनवट अशी टोळी बीडमध्ये असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून काय काय बाहेर येणार हे लवकरच समजेल. मात्र बीडमध्ये सध्या रोज धक्कादायक प्रकरणे बाहेर येत आहेत. यामुळे परिस्थिती भयंकर होत चालली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!