विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; व्हिडिओ व्हायरल…!

अगरतलळा : विधानसभेत आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनि जनतेचे प्रश्न, समस्या मांडाव्यात अशी जनसामान्यांची अपेक्षा असते. पण त्रिपुरा विधानसभेत आगळंवेगळंच प्रकरण पुढे आले आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार जादब लालनाथ यांचा पॉर्न बघतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका ंिजकत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली. सलग दुस-यांदा भाजप त्रिपुरामध्ये सत्तेत आली आहे. भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेतील आज (३० मार्च) चाच असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लालनाथ दिसत आहेत. ते सभागृहातील त्यांच्या सीटवर बसून मोबाईलवरती व्हिडीओ पाहाताना दिसत आहेत. दरम्यान हे आमदार मोबाईलवर व्हिडीओ पाहताना कॅमे-यात कैद झाले आहेत. यानंतर आता जादब लालनाथ यांच्यावर विधानसभेच्या कामकाजादरम्यान सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.