बिरदेवने आवाहन केलं बुके नको बुक द्या अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने ट्रक भरून पुस्तक पाठवली…

मुंबई : यंदाच्या यूपीएससी निकालानंतर चर्चेत आलेल्या बिरदेव ढोणे या तरुणाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. धनगर कुटुंबात जन्मलेल्या बिरदेव ढोणे यानं स्वत:च्या कष्टाच्या जोरावर आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. अनेक संकटाचा सामना करत त्याने हे यश मिळवले आहे. हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हताच.
घरात शिक्षणाचा गंध नसला तरी या प्रवास त्याला भेटलेल्या अनेकांनी मदत केल्याचं तो सांगतो. यामुळेच आता जेव्हा त्याचे सत्कार होत आहेत, तेव्हा त्यान मला बुके नको तर बुकं पुस्तकं आणा, असं आवाहन त्याने केलं आहे. या पुस्तकातून गावात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करता येईल, असा मोठा विचार त्यानं केला आहे.
असे असताना आता याच आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया यानं तब्बल १००० पुस्तकांची भेट बिरदेव यांच्या गावी पाठवली आहे. यामुळे त्यांचे देखील अनेकांनी आभार व्यक्त केले आहे. सध्या त्याचे सत्कार करण्यात येत आहेत.
शिखर पहारिया याच्या संस्थेकडून बिरदेव याच्या गावी १००० पुस्तकांची भेट पाठवण्यात आली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा झाली आहे. याबाबत मोठी गाडीच पुस्तकाची भरून त्याने दिली आहे. बिरदेवच्या आवाहनाला अनेकजण सध्या प्रतिसाद देत आहेत.