कुल यांच्या भीमा पाटस कारखान्याची श्वेतपत्रिका काढा, आता भाजप नेते वासुदेव काळे यांची मागणी…!


दौंड : सध्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 500 कोटीचे आरोप केले आहेत. आता भाजप नेत्याने याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

 

भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, कारखान्याचे माजी संचालक वासुदेव काळे यांनी केली.

 

याबाबत वासुदेव काळे म्हणाले, तीन गळीत हंगाम बंद राहिलेला भीमा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीस चालविण्यात देण्यात आला आहे. मात्र, तो सहकारी साखर कारखाना राहावा, ही भूमिका आणि अपेक्षा आमची आहे.

 

राहुल कुल हे स्वपक्षाचे आमदार असले तरी अध्यक्ष म्हणून मी त्यांना यापूर्वी देखील कारखान्याच्या आर्थिक स्थिती व धोरणांविषयी सतत प्रश्न केले आहेत. परंतु ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!