राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील, शरद पवार यांचे विधान, राज्यात पुन्हा भूकंप?


मुंबई : सध्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

त्यातच शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी मी सामान्य कार्यकर्ता आहे. साहेब आणि अजितदादा निर्णय घेतील, असं म्हटलं होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निर्णय सोपवला होता. अशातच आता शरद पवारांनी युवा नेत्यांवर निर्णय सोडला आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले, सगळ्यांची विचारधारा एक आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत.

त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी सांगितले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

याबाबत अमोल मिटकरी म्हणाले, आमचे दोन्ही पक्ष वेगळे आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात काय बोलणं झालंय याची माहिती नाही. मात्र, आमच्या पक्षात आम्ही एकत्रितपणे चर्चा करू आणि निर्णय घेऊ, यामुळे आता आगामी काळात काय होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!