शक्तीपीठ महामार्गाबद्दल सर्वात मोठी बातमी समोर! शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार, आकडा आला समोर….

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गाची चर्चा सुरू आहे. हा महामार्ग नागपूर गोवा असा आहे. याला काही शेतकऱ्यांनी विरोध केला असून काहींनी पाठिंबा दिला आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत सरकार शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बाजारभावाच्या पाचपट भरपाई देण्याचा विचार करत आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळीही शेतकरी सुरुवातीला विरोधात होते, मात्र भरपाई वाढविल्यानंतर त्यांनी संमती दिली. यामुळे कामाला गती मिळणार आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याचा विचार सुरू आहे, लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल. दरम्यान, संपादित केली जाणारी बहुतांश जमीन पिकाऊ आणि बागायती आहे. याठिकाणी चांगली पिके असतात.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला मोठा विरोध दर्शवला आहे. त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की नागपूर ते रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना, नवीन महामार्गाची गरज काय? तसेच, जमिनी संपादित झाल्यास त्यांचे तुकडे पडून उर्वरित जमीन शेतीसाठी अयोग्य ठरेल. याबाबत विचार करावा असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीच वाचल्या पाहिजेत असा ठाम पवित्रा घेतला आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध तीव्र आहे. यामुळे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भुदरगड, करवीर, आजरा, हातकणंगले, शिरोळ आणि कागल या सहा तालुक्यांमध्ये भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र हा महामार्ग पूर्णपणे रद्द झालेला नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.