महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! पहिल्या आरोपीला ठोकल्या बेड्या, नेमकं काय घडलं?


सातारा : साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती.

अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल २४ तासांनी बनकर याला अटक केली आहे. फलटण पोलीस ठाण्याचे पीएसआय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर हे आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.

मागील चोवीस तासांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आता अखेर पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथकं रवाना झाली होती. आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात होता.

त्यानंतर पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची माहिती आहे. प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता.

कुठे लपला होता आरोपी?

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले. मृत्यूपूर्वी तिने हातावर एक नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन जणांची नावं स्पष्टपणे स्पष्टपणे नमूद केली होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा माझ्या मरणासाठी जबाबदार आहे, त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला असं तिने लिहीलं होतं.

तसंच प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं तिने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं. यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. अखेर या मृत्यूप्रकरणातील पहिला आरोप प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील निंबोरे या गावातून रात्री उशीरा त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!