माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!! अजित पवारांनी सगळंच गणित बदललं, अजित पवारच स्वतः होणार माळेगावचे चेअरमन…


बारामती : माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता कारखान्याचे चेअरमन स्वतः अजित पवारच होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे आता निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनी घोषणा केल्यानंतर सर्वांनी एकच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी माळेगांव कारखान्याचा चेअरमन प्रचाराच्या शुभारंभावेळी जाहीर करणार असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज ही घोषणा केली आहे. पवार यांनी माळेगांवच भल करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. कारखानदारी अडचणीत आहे, असेही ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले, प्रपंचाचा ठिकाणी वाद मतभेद बाजूला ठेवा. कुणी गडबड केली तर आताच एकवीस उमेदवारांची राजीनामे घेतले आहेत. तुम्ही मला आठ वेळा आमदार म्हणून निवडून दिलं आहे. एकदा खासदार केलं आहे. लवकर उठून जनतेची काम करत असतो.

तसेच सगळ्यांनी पॅनल टू पॅनल मतदान करा. माझ्याकडे बघून मतदान करा. तुमचा चेअरमन मीच होणार असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच त्यांनी विरोधकांवर अजित पवार यांनी फॉर्म का भरला? तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्हाला आता मुद्दा राहिला नाही. खोटं बोलायचं. समोरासमोर या. आता होणाऱ्या संचालकांना गाडी, हॉटेलच बिल मिळणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!