सर्वसामान्यांना मोठा झटका, आज सोने १ लाखाच्या पार?, जाणून घ्या आजचे नवीन दर..

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.
त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान , सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आजच ते एक लाखाचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, या महिन्यात सोने 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे. चांदीही मागे नाही, तिच्या दरातही मोठी वाढ होत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर आकाशाला भिडत आहेत. मार्चपासून सुरू झालेली वाढ अजूनही कायम आहे. याच आठवड्यात 16 एप्रिल रोजी सोने तब्बल 990 रुपयांनी वाढले, तर 17 एप्रिलला 1140 रुपयांनी दर वधारले. गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचा दर 97,460 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
जळगाव येथील सराफा बाजारातही जीएसटीसह सोन्याची किंमत 97 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे शंभरी पार करण्यासाठी सोन्याला आता फार मोठी झेप उरलेली नाही. बाजारातील चढत्या किंमती पाहता, गुंतवणूकदार आणि खरेदीदार या दरांच्या हालचालींकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मार्चपासून सतत वाढ होत आहे. आठवड्याभरात चांदी 200 रुपयांनी महागली असून, एका किलो चांदीचा दर आता 1,00,000 रुपयांवर पोहचला आहे. ही दरवाढ काहीशा चढ-उतारानंतरही कायम असून गुंतवणूकदारांमध्ये यावरूनही उत्सुकता निर्माण झाली आहे.