ठाकरेंना मोठा धक्का! मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भावाचा भाजपात प्रवेश…

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे यांची साथ सोडत थेट भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा भाजपा प्रवेश पार पडला आहे. त्यामुळे भाजपला आणखीनच बळ मिळाल आहे.

कोण आहेत भारत कोकाटे?

भारत कोकाटे हे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही भावांमध्ये राजकीय मतभेद आहे. भरत कोकाटे हे सोमठाणे गावाचे सरपंच राहिलेले आहेत. सिन्नर तालुक्यात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे. आता भारत कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सिन्नर तालुक्यात भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी घेतलेल्या या निर्णयाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 2022 साली भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रेशानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत कोकाटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला बळ मिळेल. मी भरत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत करतो, असे रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.
