राहुल गांधी यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयात ‘या’ प्रकरणात याचिका मंजूर…

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची २१ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी निकाल कायम ठेवला होता.
गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, राहुल गांधींना लगेच जामीन मंजूर करण्यात आला.

मात्र दोषी घोषित केल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होत आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या बाजूने निर्णय दिला तर राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात.
