सोने-चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा, दिवाळीनंतर दरांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या….

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम आहे.
आज, गुरुवार (३० ऑक्टोबर), सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घट नोंदवण्यात आली आहे, ज्यामुळे विक्रमी उच्चांकावरून दर लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.

आजच्या सत्रात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,३७५ रुपयांची घट झाली, तर चांदी प्रति किलो १,०३३ रुपयांनी स्वस्त झाली. ही घसरण लग्न खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा मानली जात आहे, कारण दर विक्रमी पातळीवरून खाली येत आहेत.

सोन्याचे भाव १७ ऑक्टोबर रोजी गाठलेल्या सर्वकालीन उच्चांकापासून आतापर्यंत ११,६२१ रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली असून, ती १४ ऑक्टोबरच्या उच्चांकावरून ३२,५०० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
आजच्या घसरणीनंतर, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,८३० रुपये (प्रति १० ग्रॅम) झाला आहे. २३ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर १,२२,३३८ रुपये, २२ कॅरेटचा भाव १,१२,५१३ रुपये, आणि १८ कॅरेटचा दर ९२,१२३ रुपये (मेकिंग चार्ज वगळून) झाला आहे. जीएसटीसह चांदीचा दर १,४९,९६८ रुपये प्रति किलोवर आला आहे.
दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, २९ ऑक्टोबरला जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोने १,२०,६२८ रुपयांवर बंद झाले होते, जे आज सकाळी १,१९,२५३ रुपयांवर उघडले. या घसरणीनंतरही, या वर्षात सोने ४३,५१३ रुपयांनी आणि चांदी ५९,५८३ रुपयांनी महाग आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यातही घसरण होऊनही सोन्यात ३,९०४ रुपयांची वाढ कायम आहे.